Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी महोत्सव साजरा #Sindewahi

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सामाजिक क्रांतीचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त "'जय ज्योती -जय क्रांती "च्या उदघोषात भव्य रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, आणि सायं. 3.00 वा. अभिवादन सोहळा, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.

प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटक- मान.प्रा. विजय लोनबले सर जिल्हाध्यक्ष ,अ.भा. महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर. कार्यक्रमाचे अध्यक्ष- मान.राहुलभाऊ पंचभाई सरपंच ग्रामपंचायत वाकल, प्रमुख वक्ते- मान. दिनकरजी मोहूलेंं अध्यक्ष ज्ञानज्योती फाउंडेशन सावली, मान. मधुकरजी मोहुलेंं जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद चंद्रपूर, सौ. मंगलाताई मधुकर मोहुलेंं शिक्षिका महात्मा फुले हायस्कूल गिरगाव, डॉ. चिंतामनजी कामडी साहेब, इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान समता परिषदेच्या व आयोजकांच्या वतीने कोरोना काळात गावकऱ्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ. चिंतामण कामडे तसेच सामाजिक सेवेत सदैव तत्पर असणारे श्री. रामचंद्रजी मोहुलेंं यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.
मंचावर प्रमुख पाहुणे-मा. दिनेश भाऊ मांदाळे उपसरपंच, नन्नावरे सर मुख्याध्यापक, टेंभुर्णे सर, श्री.राहुल चिलमवार, सौ सविता कोकोडे, सौ.मंगला गावतुरे, सौ.नंदा भोयर, श्री.दिलीप गाऊत्रे पोलीस पाटील, श्री.सिद्धार्थ पंचभाई श्री पितांबर नागदेवते श्री विलास भंडारे श्री हरिचंद्र मांदाळे श्री साजन गावतुरे श्री सुनील बोरकर श्री कमलाकरजी कावळे श्री नरेंद्र मांदाळे श्री. गिरीधर चीलमवार श्री रमेश मेश्राम,गीताताई कन्नाके, अतुल तालेवार, उषाताई कावळे, वंदनाताई कावळे , महात्मा फुले समता परिषदेचे युवा कार्यकर्ते आशिष कावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रामचंद्रजी मोहुलेंं, संचालन कु. दिपाली कोटरंगे, तर आभार प्रदर्शन शुभम गाऊतुरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व समाजातील बंधू-भगिनी, विद्यार्थी, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत