माणिकगड सिमेंट कंपनीचा पुन्हा एक प्रताप #Korpana

Bhairav Diwase
वायुप्रदूषणासोबत जलप्रदूषण करण्यास कंपनीचा हात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात वसलेल्या माणिकगड सिमेंट कंपनी दिवसेंदिवस या ना त्या कारणाने चर्चेचा विषय बनला आहे. अनेक वर्षांपासून वायुप्रदूषण सोडून नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. पण कंपनी विरोधी कोणी ही बोलायला तयार नाही. त्यामुळेच नागरिकांना व शेतकऱ्यांना वायुप्रदूषणाला सामोर जावे लागत आहे. व आपले आयुर्मान कमी होताना दिसत आहे‌
माणिकगड कंपनीने पाच सहा दिवसापासून एक वेगळ्याच प्रकारचा केमिकल युक्त डस्ट नाल्यात सोडला त्यामुळे जनावर हे पाणी पिल्यास ते मृत्यू पावेल की गँभिर आजाराला सामोर जावे लागेल हे तर पाण्याच्या तपासणीवरच अवलंबून राहील तत्पूर्वी याची तक्रार जलसंपदा विभागाकडे करणाऱ्याच्या हालचाली सुरू आहे. व कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.