भद्रावतीचे तहसीलदार डॉ. निलेश खटके एसीबी च्या जाळ्यात #lcb

Bhairav Diwase
25 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक
भद्रावती:- भद्रावती चे तहसीलदार डॉ. नीलेश खटके हे प्रत्त्येक रेती वाहतूक करणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत होते. विटा भट्टी साठी लागणाऱ्या लाल माती उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी फिर्यादीला तब्बल 25 हजार रुपये मागितले मात्र लाच द्यायची इच्छा नसल्याने याबाबत फिर्यादीने लाचलुचपत विभागाला सम्पर्क साधत तक्रार केली. तहसीलदार खटके पैशाची मागणी करीत होते त्यामुळे संबंधित व्यक्तीने तहसीलदार यांची मस्ती जिरवायचा निर्णय घेऊन चंद्रपूर लाचलुचपत विभागाला माहिती दिली आणि ठरल्याप्रमाणे तब्बल 25 हजाराची लाच घेताना भद्रावती येथे अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे