सावली नगरपंचायत निवडणुकीत ४७ उमेदवार रिंगणात. #Saolinews #Saoli

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सावली नगरपंचायतीचे २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर १६ नामांकन अवैध ठरले. त्यामुळे सावली नगरपंचायतीसाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे आदेश देत, महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. या आदेशानुसार सावली नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी ओबीसींना आरक्षित असलेल्या ३, ४ व १० प्रभागांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे १४ प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार प्रभाग १ साठी चार उमेदवार, २ साठी तीन उमेदवार, ५ साठी चार उमेदवार, ६ साठी चार उमेदवार, ७ साठी दोन उमेदवार, ८ साठी चार उमेदवार, ९ साठी दोन उमेदवार, ११ साठी चार उमेदवार, प्रभाग १२ मध्ये चार उमेदवार, १३ साठी तीन उमेदवार, १४ साठी दोन उमेदवार, १५ साठी चार उमेदवार, १६ मध्ये चार उमेदवार व प्रभाग १७ साठी तीन उमेदवार, अशी संख्या आहे. एकूण १४ प्रभागांमध्ये ४७ उमेदवार रिंगणात असले, तरी उमेदवारी मागे घेण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने खरी परिस्थिती तेव्हाच कळेल