१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार #Rape

तीन आरोपी अटकेत
पोभूर्णा:- एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथे घडली.
पोंभुर्णा शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीतील नवेगाव मोरे येथील तिन युवकांनी एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लाऊन व बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. असाह्य व अल्पवयीन मुलीला बदनामीची भिती दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत या तीनही युवकांनी चार महिण्यापुर्वी आळीपाळीने अत्याचार करुन गर्भवती केले.मात्र मुलीच्या पोटात खुप दुखू लागले असल्याने आईने तिला दवाखान्यात नेले व सोनोग्राफी केले असता मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकारणाबद्दल मुलीला विचारले असता मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितली. घटनेबद्दल पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथे फिर्याद देण्यात आली. फिर्यादीवरुन दिनांक १० डिसेंबर ला आरोपी सौरभ ढवस,रोशन कष्टी,मनोज पाल सर्व राहणार नवेगाव मोरे यांना पोलिसांनी अटक केले व त्यांच्यावर अपराध क्रमांक १२३/२०२१ कलम ३७६ (३),३७६ (ड) (अ),५०६ भादवी सहकलम ६ लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोंभूर्णाचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्को पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री रामटेके करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या