💻

💻

रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण निवारा बांधा प्रहार ची मागणी #Korpana

रुग्णासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करा. जिल्हा शल्यचिकित्सकांना प्रहारचे निवेदन
कोरपना:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय गडचांदुर चे आहे रुग्णकल्याण समिती फक्त फलकावर नावासाठीच आहे तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतआहे कोरपणा जिवती तालुक्यातील संपूर्ण रुग्ण हे गडचांदुर रुग्णालयात उपचारासाठी येतात रुग्ण कोणताही असो प्रथम त्याला गडचांदुर ग्रामीण रुग्णालय तच भरती करतात रुग्ण गंभीर असल्यास त्याला चंद्रपूर येथे हलवले जातात रुग्णलया परिसरात अस्वच्छता रुग्णाना शुद्ध पाणी आशा अनेक समस्यांचा सामना रुग्णांना करावा लागत आहे.
प्रहार चे बिडकर यांनी रुग्णालयातील अनेक समस्यांन बद्दल तक्रारी व निवेदन देऊन अनेक कामे केली अशातच गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय ची मागणी मागील अनेक वर्षांपासून करत आहे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राठोड ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार अशी माहिती मिळताच प्रहारचे बिडकर, इंजि वाघमारे, पंकज माणुसमरे, सागर गुडेल्लीवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गाटे यांची भेट घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण निवारा बांधून देण्यात यावा व बंद असलेले मिनी वॉटर फिल्टर प्लांट सुरू करून रुग्णांना व नातेवाईकांना शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करा असे निवेदन देण्यात आले व रुग्णालयाच्या बाहेच्या बाजूला वाढलेले झाडे झुडपं काटून रुग्णालयातील बाहेरचा परिसर स्वच्छ साफ करण्याची मागणी केली.
ओ पी डी च्या वेळेस एकच डॉक्टर असतात त्यामुळे त्या डॉक्टरकडे रुग्णांची जास्त गर्दी असते सकाळच्या ओ पी डी 9 ते 12 या वेळेस दोन डॉक्टर व आय पी डी मध्य एक डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी प्रहार च्या वतीने सतिश बिडकर, इंजि अरविंद वाघमारे, पंकज माणुसमारे, सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, अनुप राखूनडे, दिनेश आमने, अरविंद सरवर, पेंदोर, प्रतीक खैरे,अनेक कार्यक्रत्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडे निवेदनातून केली.
🌆‌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत