💻

💻

पोलिसांनी पाच दिवसांत केला सुबोधच्या खुनाचा उलगडा #murder #police #arrested

गडचिरोली:- रविवार 19 डिसेंबरच्या रात्री आशिर्वाद नगरातील केलसोदीन जनबंधू यांचा मुलगा सुबोध या 19 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित पाच दिवसांतच खुनातील दोन आरोपींना 24 डिसेंबरला देऊळगावातून अटक केली आहे.
आरोपींमध्ये सुबोधच्या मावशीचा मुलगा सोनू मेश्राम 21 वर्ष व त्याचा मित्र सुमित मेश्राम वय 22 दोनही राहणार देऊळगाव यांचा समावेश आहे. प्राप्त माहिती नुसार, सुबोधचे आई वडिल घटनेच्या एक दिवस आधी तेरवीच्या कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले होते. याच कालावधीत सुबोधच्या मावशीचा मुलगा सोनु आणि त्याचा मित्र सुमित गडचिरोलीत सुबाेधच्या घरी जावून सुबोधला देऊळगावला घेवून गेले. तेथून तिघेही खडकी गावात पोहचले. मात्र सुबोध हा दुपारी 2.30 वाजता आपल्या घरी परत आला. दोन्ही आरोपींच्या लक्षात आले की, सुबोधचे आईवडिल कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेले असल्याचे सुबोध घरी एकटाच राहणार. हिच संधी साधून सोनू आणि त्याचा मित्र सुमित याने रात्री सुबोधच्या घरातील मागच्या दरवाज्यातून प्रवेश करीत सुबोधला मारहाण करीत त्याचे हात बांधले व नंतर त्याच्या डोक्यावर प्लॉस्टीक टाकून स्वास बंद करून निर्घृन हत्या केली. हत्तेनंतर घरातील अलमारीतून 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, यांच्या मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, सहायक पोलिस निरिक्षक चव्हाण, गोरे, मोहीते, एलपीसी चौधरी, कुडावले, हलामी, ओम पवार, हेड कॉन्स्टेबल वाळके, सय्यद, नवघरे, कोसनकर आदिंनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत