💻

💻

पोंभुर्णा तालुक्यात शेळीवर कृत्रिम रेतनाचा पहिला प्रयोग #Pombhurna

पशुसखीच्या अभ्यास सहलित कृत्रिम रेतनाचे धडे
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत पशु सखी यांचे दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण जिवनोन्नती प्रभाग संघ नवेगाव मोरे येथे घेण्यात आले.
दूसऱ्या दिवशी क्षेत्र भेट म्हणून पशु सखिना सलीम कुरेशी यांच्या गोट फॉर्म ला भेट दिली. भेटीत आधुनिक शेळीपालक कुरेशी यांचे कळील कबरीच्या शेडची पाहणी करण्यात आली. त्यामधे शेळ्यांचे व्यवस्थापन करीत असताना चारा स्टैंड, पानी स्टैंड, गाबन शेड्यांची काळजी ,कर्ड्यांचे संगोपन, लसीकरण, डीवर्मिंग व औषध उपचार इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल घिवे यांनी पशुधनावर आधारित सखोल माहिती पशु सखीना दिली.

ग्रामीण भगातील पशुपालक लोकाना उत्तम दर्जाचे जातिवंत बोकड उपलब्ध व्हावे. यासाठी डॉ. घिवे तालुक्यात अविरत कार्य करीत आहेत. परंतु कमी वेळेत ही माहिती जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचविण्याकरिता उमेद अभियानातील पशुसखी हा महत्वाचा दुवा आहे हे समजून त्यांना प्रशिक्षित करणे व त्यांच्या माध्यमातुन गावा गावातील पशु पालक लोकांपार्यंत कृत्रिम रेतन काय आहे , ते कशासाठी करावे, याची संपूर्ण माहिती ग्रामीण भागातील पशुपालक लोकापर्यंत पोचविण्यासाठी व कृत्रिम रेतन कसे करावे याचे ज्ञान पशुसखीना असावे यासाठी डॉ. घीवे यांनी पशु सखीना प्रात्यक्षिक करुण दाखविले. याप्रसंगी पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल घिवे, तालुका अभियान व्यवस्थापक राजेश दूधे व कर्मचारी, पशु व्यवस्थापक, कृषि व्यवस्थापक, व पशु सखी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत