पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीत "भूमिपुत्र ब्रिगेडची" एन्ट्री #Pombhurna

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सध्या नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणूक होत असून या रणधुमाळी मध्ये भाजप, कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे प्रस्थापित पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे.
जिल्ह्यातील पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, विजयी गुलाल कुणाचा यावर सर्व राजकीय पक्ष आपले अंदाज लावत आहे, प्रचाराला सुरुवातही झाली मात्र ओबीसी आरक्षित जागेवर अद्याप काही निर्णय न आल्याने सर्व आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.
पोंभुर्णा नगरपंचायत मध्ये प्रस्थापित पक्षांना धक्का देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या भूमिपुत्र ब्रिगेडने एन्ट्री केली आहे. या सामाजिक संघटनेचे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
भूमिपुत्र ब्रिगेडने आपला जाहीरनामा जाहीर केला असून त्यामध्ये नगरपंचायत चौकाचे नामकरण सावित्रीबाई फुले चौक करीत त्याठिकाणी सावित्रीबाई यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार, प्रत्येक घरात नळ जोडणी सह स्वच्छ पाण्याचा पुरवठा, मॉडेल स्कुल उभारण्यासाठी पुढाकार, सांडपाणी व मल निस्सारण प्रकल्प उभारणे, लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय निर्माण करणे, कृषी मार्गदर्शन केंद्राची निर्मिती, युवक व महिलांना स्वयंरोजगार व उद्योजक केंद्राची निर्मिती व मार्गदर्शन केंद्र, जनता समस्या निवारण केंद्र उभारण्याचा मानस असे अनेक नवे उपक्रम करण्यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडने कंबर कसली असून नवं व चांगलं शासन नागरिकांना देऊ असे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात भूमिपुत्र ब्रिगेडच्या संघटनेने दिले आहे.
पोंभुर्णा नगरपंचायत मध्ये नव्या राजकारणाची सुरुवात व नागरिकांना चांगलं शासन मिळावे यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. गावतुरे दाम्पत्य अफाट मेहनत घेत आहे.
डॉ.राकेश व डॉ.अभिलाषा गावतुरे दाम्पत्यानी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून जनतेला योग्य शासन देण्याची हमी दिली आहे, गावतुरे दाम्पत्यानी कोरोना काळात अनेक सेवाभावी कार्य केले आहे, आता तसेच कार्य ग्रामीण भागात करण्याचे आश्वासन या दाम्पत्यानी दिले असून प्रस्थापित पक्ष सुद्धा आता या ब्रिगेडचा धसका घेत आहे.
पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीत भूमिपुत्र ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार....

अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रभाग क्र. १ चे अधिकृत उमेदवार रायभान दामोधर वनकर

सर्वसाधारण प्रवर्गाचे प्रभाग क्र. ७ चे अधिकृत उमेदवार किशोर वारलू कुरसंगे

सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाचे प्रभाग क्र. ९ चे अधिकृत उमेदवार कौशल्या बंडूजी गुरनुले

सर्वसाधारण प्रवर्गाचे प्रभाग क्र. १३ अधिकृत उमेदवार रुपेश रमेश चन्नावार

सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गाचे प्रभाग क्र. १६ चे अधिकृत उमेदवार शुभांगी उत्तम कामटकर