Top News

चेक आष्टा मार्गावर जेरबंद झालेल्या "त्या" वाघिणीचा गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मृत्यू #tiger #death




चंद्रपूर:- महिनाभरापासून पोंभूर्णा तालुक्यातील चेकआष्टा, वेळवा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला चेक आष्टा मार्गावरील पुलात अडकल्या वाघीणीला  पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. रेस्क्यू केल्यानंतर जखमी झाल्याने नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले. उपचारादरम्यान काल 26 डिसेंबर 2021 ला रात्रीच्या सुमारास त्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
महिनाभरापासून पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावात पट्टेदार वाघिनिने धुमाकूळ घालत तिन जणांचा बळी तर पंधरा जणांना जखमी केले होते. त्यामुळे शेतकरी शेतमजूर व नागरीकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. शेतकऱ्यांना वाघिणीच्या दहशतीमुळे शेतातील पिक काढण्याचे काम थांबवावे लागले होते. वाढते हल्ले शेतकऱ्यांना धोकादायक ठरल्याने पट्टेदार वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी शेतमजूरांनी लावून धरली होती. अखेर 23 डिसेंबर ला पोंभूर्णा तालुक्यात पोंभूर्णा चेकआष्टा मार्गावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघिणीने चेक आष्टा गावाजवळ एका बकरीची शिकार केली. गावकऱ्यांनी माहिती होताच त्या वाघिणीला पळवून लावण्यासाठी गावकरी एकवटले आणि पळवून लावले. मात्र पळता पळता वाघिण एका पुलाखाली शिरली. पुलाचा पुढील भाग बंद असल्याने ती तिथेच अडकली.
पुलाखाली वाघिणी शिरल्याची माहिती पोंभुर्णा वनविभागाला मिळताच त्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तब्बल सात तासापर्यंत रेस्क्यू करण्यात आले. सात तासानंतर वाघिणीला पिंजऱ्यात पकडण्यात यश आले. तिच्या जबड्याला गंभीर जखम झाली होती. वाघिणीचा खालचा जबडा पूर्णपणे तुटल्याने या तरुण वाघिणीला  24 डिसेंबर 2021 रोजी गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले.  गंभीर अवस्थेत गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आल्यानंतर वाइल्ड लाइफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (WRTC) च्या पशुवैद्यकांनी सर्वोत्तम प्रयत्न केले  परंतु वाघिणीचा वाचविण्यात यश आले  नाही.  रात्रीच्या सुमारास त्या वाघिणीने प्राण  सोडला.  
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने