Top News

ताडोबाच्या नावावर सोशल मिडीयावर व्हायरल होणारा व्हिडिओ फेक


चंद्रपूर:- व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यात मागील काही दिवसांपासून माणसांवर हल्ला करणारा प्राणी ताडोबाच्या जंगलात आला असल्याचे व्हिडिओ व काही छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ताडोब्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी काही उपद्रवी लोकांनी हे भितीदायक छायाचित्रे व व्हिडिओ ताडोबातील असल्याचे भासवून व्हायरल केले आहे. मात्र ताडोबात असा कोणताही प्राणी नाही तसेच सदर छायाचित्रे व व्हिडिओ ताडोबातील नसल्याची स्पष्टोक्ती गाईड शाहीनाज बेग यांनी केली आहे.
मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताडोबामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्राणी आढळलेला नाही. तरी कुणीही असल्या व्हायरल व्हिडीओवर व अफवा पसरवणाऱ्या मॅसेजवर विश्वास ठेवू नये.
ताडोबा हे जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प म्हणून मानला जातो. ताडोब्याची गरिमा कमी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. वन समाचार चे प्रतिनिधी ताडोबातील महिला पर्यटक मार्गदर्शकांसोबत चर्चा केल्यास त्यांनी हा अफवा असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने