जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गडचांदूर भाग 2 (रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट) #Korpana

सुंदर गडचांदूर स्वच्छ गडचांदूर फक्त कागदावरच

प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी कुणाची नगरसेवक की नगर परिषद च्या अधिकाऱ्यांची? प्रभाग 3

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना

गडचांदूर शहरातही स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर फक्त कागदावरच कि काय याबाबत रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट आमच्या प्रतिनिधींनी सुरवात केली. आज भाग 2 ची बातमी ऑन द स्पॉट तेथील रहिवाश्यांनी दिलेली मुलाखत बघा आमच्या यु ट्यूब चॅनेल आधार न्यूज नेटवर्क वर.

सविस्तर बातमी अशी की गडचांदूर नगर परिषद होऊन 7 वर्षे पूर्ण झाली पण थेतील समस्या मात्र "जैसे थे" आहे. या कडे कुणीही जातीने लक्ष देत नाही. नगर परिषद चे अधिकारी, नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर न देता. दारू च्या दुकानावर मात्र विशेष सभा घेऊन तात्काळ मंजुरी देतात.

आमच्या प्रतिनिधींनी गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 3 कन्यका मंदिर रोड पवार यांच्या घराजवळ साचलेले डोबकाळ हे नगर परिषद ने तयार केलेले आहे, असं भेट दिल्या नंतर लक्षात आले. ऑन द स्पॉट रिपोर्ट घेतली असता त्यात नगर परिषद ने ज्या नाल्या बनवल्यात त्या नाल्यांचे सांडपाणी खुल्या प्लॉट वर जमा होत आहे. सांडपाण्याची कुठेही विल्हेवाट न लावता दुसऱ्याच्या जागेवर सांडपाणी सोडणाऱ्या नगर परिषदवर कोणती कार्यवाही वा गुन्हा दाखल केला जाता येईल का? याची सुद्धा चर्चा तेथील नागरिकांनी केली. त्या ठिकाणी एवढी दुर्गंधी आहे. की तिथं कुणी उभं सुद्धा राहू शकत नाही. गंभीर बाब म्हणजे एक बाजूच्या नालीचे सांडपाणी पवार यांच्या अंगणात टोंगळे टोंगळे जमा होते, त्यांच्या घरी चार-पाच लहान लहान मुले आहे. नालीत साचलेले सांडपाणी जेव्हा अंगणात येतात, तेव्हा त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पवार यांनी नगर परिषद ला अनेकदा निवेदन दिले. पण त्यावर कोणताही तोडगा काढला नाही किंवा नगर परिषद चे कर्मचारी अधिकारी किंवा नगरसेवक येऊन पाहत सुद्धा नाही. प्रभाग 3 च्या रहिवाश्यांनी नगर प्रशासनाला विनंती केली की एकदा मुख्याधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी या ठिकाणी फक्त 1 तास येऊन बसावे. मग त्यांना कळेल की दुर्गनधी काय असते.

येथीलच रहिवाश्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. सुंदर गडचांदूर स्वच्छ गडचांदूर हे फक्त कागदावरच का? कधी होणार आपले शहर सुंदर स्वच्छ? आणखी किती वाट पहावी लागेल असा प्रश्न मात्र जनता विचारत आहे.


व्हिडिओ बघा आधार न्यूज नेटवर्क वर त्यावर प्रभाग 3 च्या रहिवाश्यांनी दिलेली प्रतिक्रिया. एकदा अवश्य बघा आमच्या आधार न्यूज नेटवर्क रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट गडचांदूर भाग 3 ला.......  आपण सुद्धा आमच्या प्रतिनिधीला कळवा आपल्या प्रभागातील समस्या त्या पोहचवू वरच्या अधिकायपर्यंत..... आपल्या समस्या वर काही तरी तोडगा काढण्याचा प्रयत्न.... आपण ही सहभागी व्हा स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर मध्ये व आपल्या समस्या व आपल्या प्रभागातील अस्वच्छता 9890940044


💥गडचांदूर भाग क्र. १ (रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट)

https://www.adharnewsnetwork.com/2022/01/reporting.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत