Top News

गडचांदूर भाग क्र. १ (रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट) #reporting

सुंदर गडचांदूर स्वच्छ गडचांदूर फक्त कागदावरच

प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी कुणाची नगरसेवक की नगर परिषद च्या अधिकाऱ्यांची? प्रभाग 7

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
गडचांदूर हे ग्राम पंचायत चे नगर परिषद होऊन सात वर्षे पूर्ण झालीत मात्र समस्या या ग्रामपंचायत प्रमाणेच आता ही पाहायला मिळतात शहरात आधीच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाने घराघरात चर्मरुग्ण व अनेक प्रकारचे आजार होत आहे. या कडे नगर परिषदने मात्र सस्पेशल दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात वेळ, पैसा, शारीरिक, मानसिक त्रास ही होत आहे.

नगर परिषद झाल्याला सात वर्षे लोटून गेले, मात्र गडचांदूर ची परस्थिती "जैसे थे" च आहे. अनेक ठिकाणी खुल्या प्लॉट च्या जागेवर डोबकाळ भरलेले दिसतात. अनेक ठिकाणी नाल्या बुजलेल्या असतात, कुठं तर गटाराचे पाणी रस्त्यावर येताना दिसतात, इथं पर्यंतच काय की नगर परिषद मध्ये प्रवेश द्वारावरच येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र दिसतात, मात्र नगर परिषदेत प्रवेश करायचा असल्यास आधी चिखलमय होऊनच प्रवेश मिळतो. यात तिळमात्र शंखा नाही.
शहरातील प्रभाग क्रमांक 7 लक्ष्मी टॉकीज च्या मागे काही दिवसांपूर्वी आमदार साहेबांनी एका रस्त्याचे भूमिपूजन केले आणि त्याच ठिकाणी किती तरी महिन्यापासून नाली जॅम झाल्याने नालीचे पाणी बाहेर निघून भलं मोठं डोबकाळ झालं या डोबकाळाने आजू बाजूला दुर्गंधी पसरली असून अनेक रहिवासीयांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात नगर परिषद मात्र झोपेचे सोंग करून पाहत आहे.

"जे स्वतःच चिखलात राहते तर ते दुसऱ्याचे चिखल कसे साफ करणार" असा समज आता नागरिकांमध्ये जात आहे.


"माझी वसुंधरा" उपक्रम राबवून फक्त सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरात किती घाण, किती दुर्गंधी हे शहरातील नागरिकांनाच माहिती आहे. आमच्या आधार न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधींनी रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट दाखवणार आहे. आणखी काही ठिकाणी जाऊन स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर ची पोलखोल करणार आहे त्यातीलच हा भाग क्र. १ आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने