Top News

गडचांदूरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई Korpana

ठाणेदारांनी जनतेला केले माक्स लावण्याचे आव्हान
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोविड 19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे.याविषयी शासनप्रशासन गंभीर असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे.नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश असल्याने ठिकठिकाणी याची मोठ्याप्रमाणात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे पोलीस स्टेशन,महसुल विभाग व नगरपरिषदेच्या पथकाकडून मागील तीन दिवसांपासून शहरात बिनधास्त विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.15 जानेवारी रोजी येथील संविधान चौक व बसस्थानक परिसरातील काही दुकानदार व लहानमोठे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच मास्क नसलेल्यांना ठाणेदार सत्यजित आमले यांनी मास्कचे वाटप करत कोविड संबंधी शासनप्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन संबंधित नागरिकांना केले.सदर कारवाईत येथील पटवारी,नगरपरिषद व पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने