5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार #Tyranny

Bhairav Diwase
कोरपना:- गडचांदूर येथील शास्त्रीनगर वार्ड क्रमांक 5 येथे एका 5 वर्षिय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना 13 जानेवारी रोजी उघडकीस आली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई त्यांच्या चिकनच्या दुकानात असताना त्यांची 5 वर्षीय मुलगी ही घरी एकटीच होती. विधी संघर्षित बालक यांनी पीडितेच्या घरी जाऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
सदर प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. तातडीने याची दखल घेत पोलिसांनी आरोपी बालकाला अटक करून त्याच्या विरूद्ध कलम 376(AB), 376(2)(N) भादवी सह कलम 4, 6 पास्को अंतर्गत कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात महिला PSI खोब्रागडे तपास करीत आहे.