Top News

ट्रकने कामगारास चिरडले #accident

तब्बल चार तासानंतर झाला रस्ता मोकळा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदाफाटा जवळील रामनगर येथे 2 जानेवारी रविवार रोजी सकाळी भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवले. या घटनेत गंभीर जखमीच्या उजव्या पायावरून ट्रक गेल्याने त्यांचा पाय कायमचा मोडला. यानंतर, संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास वाहतूक अडवून ठेवली होती.

गडचांदूर जवळील नांदा फाटा लगत असलेल्या रामनगर येथे ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडविले. यात गंभीर जखमी कामगाराला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवली असून मागील ४ तासांपासून गडचांदूर - वानोजा राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली होती.मारोती गुलबाजी नवघडे ५५ वय वर्ष राहणार बिबी असे अपघातातील जखमीचे नाव आहे. ते अल्ट्राटेक कंपनी येथे आज रविवारी सकाळी कामास गेले होते.मात्र, आज त्यांची ड्युटी न लागल्याने ते सायकलने घरी परत होते.
दरम्यान, बिबीलगत असलेल्या रामनगर येथे भरधाव मालवाहू ट्कने (एमएच ३४ एव्ही २७६७ सीसीआर) धडक देत त्यांच्या उजव्या पायावरून गेली. या घटनेत मारोती गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना त्यांचा उजवा पाय कायमचा गमवावा लागला आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत
तब्बल चार तासांनी मध्यस्थीने निघाला तोडगा

सदर जखमी व्यक्ती कुटुंबातील कमविता असल्याने त्यांचा उजवा पाय कायमचा गेल्याने भविष्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न कुटुंबावर येण्याची शक्यता आहे जखमी मारोती नवगडे ला घटनास्थळी नगद घटनास्थळी नगदी रोख ५०,००० ( पन्नास हजार) व आणखी दोन महिन्यात ५०,००० (पन्नास हजार) व बारा महिने प्रतिमाह ८,००० (आठ हजार ) असा एकूण १,९६,००० रोख   व उपचारार्थ संपूर्ण खर्च देण्यात येणार असल्याचे सीसीआर लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पत्रावर लिखित देण्यात आले.
   
रोडलगतचे पार्किंग वाहन हटविण्याची मागणी

अंबुजाफाटा,गडचांदूर ते नांदाफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी वाहना उभी असल्याने अशाप्रकारे अपघात घडत असल्याचे बोलले जात असून पोलीसांनी याकडे जातीने लक्ष देऊन रस्ता मोकळा करावा आन्यथा भाविष्यात मोठा जन आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.आता पोलीस प्रशासन याकडे किती गंभीरतेने पाहतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने