बल्लारपूर:- तिघा मित्रांनी मिळून मनसोक्त बीअर ढोसली. पुन्हा बीअर पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दुसऱ्या मित्राने पुढे ठेवलेली बीअरची बाटली फोडून मित्राच्याच पोटात खुपसली. ही थरारक घटना येथील टेकडी विभागातील बिरसा मुंडा चौकात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
शाहरूख शेरखान पठाण ( २६ ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला चंद्रपूर येथे कोलसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी बल्लापूर पोलिसांनी निरज उर्फ झनवा महेंद्र यादव ( २५ , रा . मौलाना वॉर्ड) व अंकित ताराचंद रामटेके ( २१ ) याला भादंविच्या कलम ३०७ , ३४ अन्वये अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरी शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.