पटेलनगरात आ. मुनगंटीवार यांची उपस्थिती , नागरिकांशी साधला संवाद
चंद्रपूरात ३०० बुथवर मन की बात
भारताच्या विकासाच्या दृष्टीने, लोककल्याणाच्या दृष्टीने भारतीय नागरिकांशी हितगुज करण्यासाठी ‘मन की बात’ हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केला. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे अर्थात हुतात्मा दिनाचे औचित्य साधुन चंद्रपूर महानगरातील ३०० बुथवर मन की बात ऐकण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टीने केले आहे. पंतप्रधानांची मन की बात एका कानाने ऐकणे व दुस-या कानाने सोडून देण्यासाठी नाही तर या देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचे संवादप्रधान माध्यम असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहरातील पटेलनगर परिसरातील बुथ क्र ३१२ च्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा नेते प्रमोद कडू, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, डॉ. दीपक भट्टाचार्य, देवानंद वाढई, धनराज कोवे, संदीप देशपांडे, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. प्रज्ञा बोरगमवार, रामकुमार आकापेल्लीवार, मोहम्मद जिलानी, राकेश बोमनवार, शहनवाज शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. शेकडो देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देत स्वातंत्र्याचा हा मंगलकलश आपल्या हाती सोपविला तो या देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी. हुतात्म्यांचे हे बलिदान सार्थ ठरविण्याची जबाबदारी आपली आहे. या देशाच्या प्रगतीचे आकलन धनाच्या नाही तर समाधानाच्या आधारे केले जाते असे सांगत पंतप्रधानांच्या मन की बात मधील मार्गदर्शनाच्या माध्यमातुन हा देश विकासाच्या मार्गावर कायम अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान पटेलनगरातील सैय्यद अशरफ अली, अन्सार अत्तारी, तनवीर मौलाना या मौलवी बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच अॅड. क्षमा पठाण, नसरीन, अंजुमन बानो, रूकय्या शहा, श्रीमती जिलानी आदींचे सत्कार करण्यात आले.
चंद्रपूर महानगरात देशातील सर्वोत्तम ठरावे असे मेडीकल कॉलेज आपण निर्माण केले. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने कॅन्सर हॉस्पीटलचे निर्माण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे कॅन्सर हॉस्पीटल बारामतीमध्ये उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. देशाचा गौरव ठरावा अशी सैनिकी शाळा, वनअकादमी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आपण निर्माण केल्या. विकासाच्या मार्गावर चंद्रपूर महानगर अग्रेसर राहावे यासाठी भाजपा कटिबध्द असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
पटेल नगरात होणार पक्क्या रस्त्याचे बांधकाम
पटेलनगर येथे येताना तेथील रस्ता कच्चा असल्याचे निदर्शनास आले. आ. मुनगंटीवार यांनी महापौर राखी कंचर्लावार यांना पक्क्या रस्त्याचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले. या रस्त्याला ‘मन की बात मार्ग’ असे नामकरण करण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या. हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा याकडे नागरिकांनी स्वतः लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत