इंस्टाग्रामवर अश्लील भाषा, धमकीचे व्हिडिओ बनवणारी 'थेरगाव क्वीन' अटकेत #arrested

पुणे:- इंस्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पोष्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी अद्दल घडवत अटक केली आहे. या प्रकरणी साक्षी हेमंत श्रीश्रीमल, कुणाल कांबळे आणि साक्षी राकेश कश्यप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
'थेरगाव क्वीन' नावाने अकाउंट

'थेरगाव क्वीन' नावाने साक्षी श्रीश्रीमहाले हिचे इंस्टावर अकाउंट असून, त्यावर तिच्या मित्र आणि मैत्रिणीसह अश्लील भाषेतील, धमकीचे व्हिडिओ पोष्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.
गुन्हा दाखल...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साक्षी श्रीश्रीमहाले हिचे इंस्टाग्रामवर 'थेरगाव क्वीन' नावाचे अकाउंट आहे. त्यावर, संबंधित आरोपी साक्षी श्रीश्रीमल, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे अत्यंत अश्लील भाषेत आणि धमकीचा व्हिडिओ बनवून ते इंस्टावर पोष्ट करत असल्याची माहिती आणि त्यांचा व्हिडिओ वाकड पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी तरुणींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत