Click Here...👇👇👇

तांदूळाचा काळाबाजार... #Rice

Bhairav Diwase
अवैध मार्गाने अनाज नेणाऱ्या दोन पिकपवर कारवाई

विरुर स्टेशन पोलीसांची कारवाई
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- लगतच्या तेलंगणा राज्यातील कागजनगर व माकोडी येथील शेतकरी आपला तांदूळ रेल्वेने आणून विरुर (स्टे) येथील बाजारात विकत आहे. तर काही शेतकरी आपल्या नातेवाईकांना देत असल्याची माहिती मिळाली. मात्र, दररोज विरुर रेल्वे स्टेशनवर उतरणारा तांदूळ कोणत्या नातेवाईकांकडे जातो. विरुर (स्टे.) ही बाजारपेठ एवढी मोठी आहे की, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात तांदूळ उतरवून विकल्या जात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. अधिक माहिती घेतली असता तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले.
तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ विरुर स्टेशन येथे आणून जिल्ह्यासह गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात नेऊन पॅकिंग बदलवून विकला जात असल्याच माहिती विरुर पोलिसांना मिळाली असता. दि. 30/1/22 रविवारी दुपारच्या सुमारास आंद्रा मार्गे येणाऱ्या ट्रेन ने आलेले तांदूळ पिकप मध्ये भरून नेत असताना पोलिसांनी तांदूळ भरलेले दोन वाहनांवर कारवाई केली असून पोलीस स्टेशन मध्ये वाहन जमा केली आहे. पुढील कारवाईसाठी तहसीलदार तसेच पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. हि कारवाई विरुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी माणिक वाग्दरकर, विजय तलांडे, राहुल सहारे, अतुल शहारे, स्वप्नील चांदेकर यांनी केली आहे.
ठाणेदार राहुल चव्हाण यांना अधिक माहितीसाठी आधार न्युज नेटवर्क चे प्रतिनिधींनी विचारले असता ठाणेदार राहुल चव्हाण यांनी म्हणाले की, तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ विरुर स्टेशन येथे आणून जिल्ह्यासह गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात नेऊन पॅकिंग बदलवून विकला जात असल्याची माहिती विरुर पोलिसांना मिळाली असता दि. 30/1/22 रविवारी पोलिसांनी तांदूळ भरलेले दोन वाहनांवर कारवाई केली असून पोलीस स्टेशन मध्ये वाहन जमा केली आहे. पुढील कारवाई चा अधिकार तहसीलदारांना असल्याने तहसिलदारांना पत्र पाठविले असून तहसीलदार आणि अन्न पुरवठा विभाग पुढील कारवाई करेल असे सांगण्यात आले.