सेवा सहकारी संस्था हिवरा येथे भाजपप्रणीत आदर्श शेतकरी विकास आघाडी 11 जागा जिंकत दणदणीत विजय #result

काँग्रेस प्रणीत मुंजनकर गटाचा दारुण पराभव
संग्रहित छायाचित्र


गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सहकारी क्षेत्रातील सेवा सहकारी संस्था हिवरा र.जी. ४८ मध्ये दिनांक ३० जानेवारी पार पडलेल्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागा भारतीय जनता पार्टी प्रणित आदर्श शेतकरी विकास आघाडीने जिंकून सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व राखले. हिवरा येथील सरपंच निलेश पुलगमकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पॅनल नी लढवली. पुलगमकर यांचा सुध्धा दणदणीत विजय झाला.
मागील तीस वर्षांपासून अविरत सत्ता असलेल्या काँग्रेसप्रणीत मुंजनकर गटाचा दारुण पराभव झाला असून त्यांचे केवळ दोन जागेवर उमेदवार विजयी झाले. त्यात एका जागेवर मुंजनकर गटाने ईश्वर चिठ्ठीने विजय मिळवला तर एक जागा केवळ एक मताने जिंकता आली. हिवरा सेवा सहकारी संस्थांमध्ये मागील तीस वर्षापासून काँग्रेसप्रणित मुंजनकर गटाचे वर्चस्व होते. अनेकदा निवडणुका अविरोध जिंकून मागील ३० वर्ष हिवरा येथील सहकार क्षेत्रात सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. मात्र त्यांच्या सुमार कामगिरी मुळे मतदारांनी त्यांना चांगलाच धक्का दिला. शेतकऱ्यांना आवश्यक वेळी पीक कर्ज वाटप न केल्याने कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी निलेश पूल गमकर यांच्या नेतृत्वात आदर्श शेतकरी विकास आघाडी पॅनल ला बहुमत देत मुंजनकर यांना सत्तेपासून कोसो दूर ठेवले.
विजयी झालेल्या उमेदवारामध्ये सर्वसाधारण गट निलेश पुलगमकर ,दिनेश कुत्तरमारे, विलास कुत्तरमारे, विलास नागापुरे, सुधाकर हिवरकर, चांगदेव सहारे, शांताराम मेश्राम, तर महिला राखीव गटातून सिंधुबाई कुत्तरमारे, ज्ञानेश्वर लखमापूर अनुसूचित जाती, कचरू डोंगरे ,विमुक्त भटक्या जाती गटातून शंकर ठाकूर यांनी विजय संपादन केला तर गजेंद्र चौथाले हे केवळ एक मताने विजय झाले. गयाबाई डोके ह्या ईश्वर चिठ्ठीवर विजय झाल्या सदर निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते यांनी आपली पूर्ण ताकद सहकार क्षेत्रातील सोहनप्रभुं मुंजनकर व रतनजोत कांबळे यांच्या बाजूने भक्कमपणे ताकत लाऊन होती. मात्र हिवरा येथील सरपंच निलेश पुलगमकर यांनी १३ पैकी ११ जागा जिंकत सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवून दिले त्यामुळे तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत