Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी पोलीस सुसंवाद व निबंध स्पर्धा


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- पोलीस स्टेशन विरूर येथे पोलीस स्थापन वर्धापन दिनानिमित्त परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून  विविध कार्यक्रम घेण्यात आला.
 विद्यार्थ्यांना पोलीस कामकाज पोलीस ठाण्यात ठेवलेल्या आधुनिक शास्त्राचे निरीक्षण करून शस्त्र बाबत विरूर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार माणिक वाग्धरकर व पोलीस हवालदार मल्लया नर्गेवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना शस्त्र कशाप्रकारे चालवायचे या संबंधी माहिती जाणून घेतली. तसेच सायबर गुन्हे व महिलावरील होणाऱ्या अत्याचाराबाबत  मार्गदर्शन केले. 
 यामध्ये विद्यार्थ्यासाठी  निबंध स्पर्धा घेण्यात आली यात इंदिरा गांधी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गुरुनानक विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, सम्राट अशोक कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी आश्रम शाळा सुबई यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
 निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अचल रामटेके सम्राट अशोक महाविद्यालय लक्कडकोट, दुसरा क्रमांक प्रज्वल बंडू सोनुर्ले साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव, तिसरा क्रमांक सानू जैनुद्दीन सय्यद सम्राट अशोक महाविद्यालय लक्कलकोट,चौथा क्रमांकअनुष्का संतोष मून सम्राट अशोक महाविद्यालय लक्कडकोट यांनी पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहुल चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार मल्लय्या नर्गेवार, दिवाकर पवार, विजय मुंडे,सुरेंद्र काळे, अतुल सहारे, प्रल्हाद जाधव, माणिक वाग्धरकर, भगवान मुंडे, राहुल शहारे, महिला पोलीस शिपाई सविता गोनेलवार, गेडाम मॅडम आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत