Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न #Korpana

ॲड. वामनराव चटप, ललित बहाळे व गुणवंत हंगरगेकर यांचे मार्गदर्शन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सहयोगाने शेतकरी युवा आघाडीच्या वतीने दिनांक ५ व ६ जानेवारी २०२२ ला कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गडचांदूर येथील बालाजी सेलीब्रेशन हॉल येथे होणार्‍या या द्विदिवशीय शिबीराला शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यात शेतकरी संघटनेचे विचार व कार्यपद्धती, युगात्मा शरद जोशी यांचे योगदान, बाजारपेठ, तंत्रज्ञान यांचे स्वातंत्र्य व स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी विरोधी कायदे, संघटनेची बांधणी, युवकांपुढील आव्हाने, वेगळा विदर्भ कां ? यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
५ जानेवारी ला दुपारी शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले तर अध्यक्षस्थान जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्वभापचे प्रांताध्यक्ष मधुकर हरणे, माजी प्रांताध्यक्ष दिनेश शर्मा, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुधीर बिंदू, सतीश दाणी, जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात ॲड.दिपक चटप यांनी शेतकरी युवकांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीचे पैलू या विषयी आपले विचार मांडून अनुभव कथन केले. यानिमित्ताने युवकांच्या समस्या व प्रश्नांविषयी सविस्तर उहापोह झाला.
       
  या शिबिरात १४४ युवकांनी सहभाग नोंदविला. शेतकरी महिला आघाडीच्या पौर्णिमा निरंजने, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, संघटनेचे डॉ.संजय लोहे, अविनाश मुसळे, संतोष पटकोटवार, निळकंठ कोरांगे, दिनकर डोहे, प्रविण एकरे, रमजान अली, प्रा.निळकंठ गौरकर, पंढरीनाथ बोंडे, मदन सातपुते, बंडू पाटील राजुरकर, प्रविण सावकार गुंडावार, विलास धांडे, संध्या सोयाम, नगरसेविका रजिया बेगम शेख ख्वाजा, शेतकरी युवा आघाडीचे ॲड.दीपक चटप, संतोष पटकोटवार, श्रीकांत घोरपडे, मुमताज अली, नरेश सातपुते, सुनील मडावी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या युवा व महिला आघाडीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत