जाहिरात... Advertisement... विज्ञापन

"सन्मान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीचा" सप्ताह उपक्रम आयोजित #sindewahi

जि. प. सदस्य रमाकांत लोधे यांचा रत्नापुर-शिवनी क्षेत्रात सामाजिक उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- रत्नापुर, शिवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीच्या पर्वापासून ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिनापर्यंत श्री:रमाकांतभाऊ लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांच्या वतीने "सन्मान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीचा"
सप्ताह उपक्रम जि.प.क्षेत्रात (रत्नापुर-शिवणी) राबवित आहे. त्याचा एक भाग म्हणून अत्यंत दुर्गम क्षेत्रातील अतिशय रानातील (ताडोबा )दुर्गम ग्राम मौजा कारवा येथे विध्यार्थ्यांना नोटबुक आणि स्कूल बॅग तसेच मौजा पारणा व मौजा शिरकाडा येथे सर्व विध्यार्थ्यांना नोटबुक वितरित करण्यात आले.
प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर उपक्रमात मंगेश मेश्राम ग्रामपंचायत सदस्य ,रत्नापुर, रमेश हेडाऊ, संतोष हेडाऊ, वाल्मिक पेंदाम, गावातील नागरिक तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत