डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तथा गुरूदेव सेवा मंडळ वाकल तर्फे रक्तदान शिबिर #blooddonation

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- वाकल येथे "रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान"असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तथा गुरूदेव सेवा मंडळ वाकल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाकल गावामध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजन दि 2 जाने2022 ला करण्यात आले. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास ३८ च्या वर डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तथा गुरूदेव सेवा मंडळ च्या सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित रमाकांत लोधे जि. प. सदस्य, राहुल पंचभाई सरपंच ग्रा. प, दिनेश मांदाळे उपसरपंच ग्रां.प, हरीचंद्र मांदाळे अध्यक्ष गु. से. मंडळ वाकल, राहुल चीमलवर ग्रां. प सदस्य, आशिष पंचभाई अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारमंच, सुनिल बोरकर, अध्यक्ष बौद्ध समाज, सागरभाऊ गेडाम, रामचंद्र मोहुरले, प्रविण पंचभाई,अक्षयभाऊ चहांदे, प्रचित पंचभाई, प्रियल नागदेवते कृष्णा मोहूर्ले,राज्य रक्त संक्रमण परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर ची चमू या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.