Top News

भाजपा जनसंपर्क कार्यालय, पोंभूर्णा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी #pombhurna

सावित्री आईंमुळेच सर्व स्थरावर तिच्या लेकी सक्षम नेतृत्व बजावत आहेत:- जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम
पोंभुर्णा:- महिला शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने आज दुपारी १ वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय, पोंभूर्णा येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

सावित्रीबाईंमुळे शिक्षण घेऊन सर्व स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहेत म्हणूनच निर्भीडपणे उच्च पदावर कार्यरत असलेल्या सावित्रींच्या लेकिंचा कु. अल्काताई आत्राम सभापती, पंचायत समिती पोंभूर्णा यांच्या हस्ते वन परिक्षेत्राधिकरी आम्रपाली खोब्रागडे, वनरक्षक ममता राजगडे आणि पोलीस विभागात काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यांचा शाल श्रीफळ आणि एकमेकींचे तोंड गोळ करून भाजपा महिला आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी, सौ. वैशाली बोलमवार शहर अध्यक्षा, रजिया कुरेशी जिल्हा सचिव, नेहा बघेल, उषाराणी वणकर, नंदा कोटरंगे, कमलबाई कस्तुरे, वैशाली वासलवार, रोहिणी ढोले, सुलभा पिपरे, हर्षा कामिडवार, मंजुषा ठाकरे, सुनीता धोडरे, मुळे मॅडम, राठोड मॅडम, सरेखा कामिडवार, निरुता गुरणुले, वाळके ताई, मिराबाई दूधबावरे, शोभाताई कस्तुरे, कुंदाताई कस्तुरे, रंजना ताई कस्तुरे, भारतीताई कावळे, तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी भारतीय जनता पार्टीचे सर्व स्त्री आणि पुरुष प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाबरोबरच स्त्रि-सक्षमीकरणासाठी ही काम केले. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत, स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत. याचं श्रेय खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या कष्टाला व सहन केलेल्या हालअपेष्टांना जाते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने