बल्लारपूर येथे सर्व शाखिय सोनार युवा सेना महाराष्ट्र राज्य महिला मंडळाच्या वतीने बल्लारपूर येथे वृक्षारोपण. #Environment(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. . राहुल थोरात 
बल्लारपूर:- आज दिनांक ०३ जानेवारी २०२२ ला बल्लारपूर येथे सर्व शाखिय सोनार युवा सेना महाराष्ट्र राज्य महिला मंडळाच्या वतीने बल्लारपूर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.


त्यावेळी सर्व शाखीय सोनार युवा सेना महाराष्ट्र राज्य, बल्लारपूर महिला शहर अध्यक्ष कु.गीताताई वंपट्टिवार, सौ. अर्चना यदनुरवार, सौ. अर्चना मुमडवार, सौ. शारदा शिरपुरवार, सौ.शुभांगी चोपावार,सौ. प्राजक्ता कंठीवार,सौ. वेदांती कंठीवार, कु.अदिती यदनुरवार व कु.तनुश्री यदनुरवार उपस्थित होते.
येणाऱ्या काळात बल्लारपूर येथे सर्व शाखीय सोनार युवा सेना महाराष्ट्र राज्य महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम होतील असे कु. गीताताई वंपट्टिवार यांनी सांगितले.#Environment

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत