Top News

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. #Rajura




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे येथे महिला अध्ययन सेवा केंद्र व व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई जयंतीनिमित्त स्त्रियांचे संविधानिक अधिकार व भारतीय मानसिकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
   या व्याख्यानाच्या वक्त्या नाही द काझी या होत्या त्यांनी आपल्या व्याख्यानातून आपल्याला कायद्याने जे अधिकार मिळालेले आहे त्याचा वापर कसा करावा हे सांगितले त्याचा गैरवापर होऊ नये असे परखड मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम वारकड सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघर्ष काय असतो याबद्दल आपले मोलाचे असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर चेतना भोंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सारिका साबळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वनिता वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ खेराणी सर तर आय क्यू एसी कोऑर्डिनेटर डॉ मल्लेश रेड्डी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक प्राध्यापिका तसेच तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.#rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने