Top News

शहर वासीयांना पूर्वसूचना न देता महाराजस्व अभियान राबवले #Korpana

मंडळधिकारी व पटवारी यांचा गलथान कारभार प्रहारचे सतिश बिडकर यांचा आरोप
कोरपना:- तालुक्यातील सीमेंट सिटी म्हणून ओड़खलया जाणाऱ्या व सर्वात मोठी बाजार पेठ असणारा गड़चांदुर शहरात आज दिनांक 3 जानेवारीला येथील महात्मा गांधी विद्यालय येथे तहसील कार्यालय कोरपना तर्फे महाराजस्व अभियान सन 2021 / 22 एक दिवशीय आयोजन करण्यात आले.या अभियानान्तर्गत शेक्षणिक दाखले. जात प्रमाणपत्र.अधिवास प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र शेती सतबारा तसेच इतर प्रमाणपत्र ची माहिती देण्यात येणार होते .व सपूर्ण योजने चा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येणार होता तत्पूर्वी तहसील कार्यालयचे मंडळ अधिकारी व पटवारी कार्यालय यांनी शहरात जाहिरात व प्रसिद्धी करणे अत्यावश्यक होते शासनाच्या पत्रात तसे नमूद करण्यात आले की महसूल प्रशासन अधिक लोकभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी "महाराजस्व़ अभियान" राबविणेबाबत लोकसेवा हक्क़ अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी, प्रचार प्रसिध्दी व विशेष शिबीरे घेवुन विहीत दाखले प्रदान करणे असे उद्देशून 29 डिसेंम्बर च्या पत्रात तहसीलदार यांनी दिले 3 जानेवारीला महाराजस्व अभियान गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे आयोजित केले.
परंतु या अभियानाची शहरवासीयांना साधी चुणूक सुद्धा लागली नाही त्यामुळे हे अभियान फक्त दिखाव्या साठी तर झाले नाही ना अशी शंका नागरिकांन मध्ये निर्माण झाली. ज्या नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले त्या नागरिकांना या अभियानाची माहिती मिळणे गरजेचे होते पण अधिकाऱ्यांचा अकार्यक्षम तेने हे शक्य झाले नाही असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे बिडकर यांनी केला.

आणखी हे अभियान 31 डिसेंम्बर ते 31 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी आपल्या गावात वा गावा लागत कधी महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे याची चौकशी तलाठी , ग्रामसेवक सरपंच यांच्या माहिती घ्यावी व अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रहार चे सतिश बिडकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने