Top News

रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या सेवेला जनतेचा अनोखा सलाम! #Car

रुग्णसेवेसाठी दिली चारचाकीची भेट
माणसाची ओळख ही त्याच्या श्रीमंतीवर नसते तर समाजातील तळागाळातल्या जनतेसाठी तो चंदना प्रमाणे किती झिजतो यावर ठरत असते.आणि मगच त्या चंदनाच्या सुगंधा प्रमाणे त्याचा सुगन्ध वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र दरवळतो आणि मग या सुगंधाच्या प्रेमात पडलेले वेडे मुशाफिर असा सारा आसमंत आपल्या कर्तृत्वाने सुगंधित करणाऱ्या साठी काहीही करायला तयार होतात.यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलेला एक रुग्णसेवेच्या ध्यासाने पछाडलेला अवलिया गजुभाऊ कुबडे!
गजुभाऊंची मागील अनेक वर्षांपासून रंजल्या-गांजल्या जनांसाठी निःस्वार्थ भावाने सुरू असलेली रुग्णसेवा व त्यासाठी त्यांची मिळेल त्या वाहनाने सुरू असलेली भ्रमंती पाहून त्यांच्या हितचिंतक व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी चारचाकी घेण्याचा निर्णय घेतला.सर्व कार्यकर्ते व गजुभाऊचे स्नेही हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील. परंतु कोणीही हिंमत हरली नाही. गजुभाऊ साठीच्या वाहना साठी ते सर्व कार्यकर्ते सामान्य जनतेपर्यंत पोहचले. प्रत्येकांनी आप आपल्या ऐपतनुसार फुलना फुलांची पाकळी म्हणून या अभिनव यज्ञकार्यात आपले योगदान दिले. व आज दि २७ जानेवारीला या सर्व कार्यकर्त्यांनी गजुभाऊ च्या कार्याचा गौरव म्हणून दोन लाख रुपयांची आडी कार त्यांना सप्रेम भेट दिली.
     या कार्या साठी त्यांचे हितचिंतक जगदीश तेलहांडे,अजयभाऊ लढी,सतीश गलांडे,अतुल जाधव,दिवाकर वाघमारे, इरफान पठाण,सूरज कुबडे,अमित गोजे,अजय ठाकरे,मोहन पेरकुंडे,अनंता वायसे,सुधीर मोरेवार संतोष जोशी,सुरज साखरकर, समीर मानकर,रितेश गुडगे अजय खेळकर विजय पडोळे, तबरेज पठाण पिंटू हिवंज, राहुल पाटील,या व असंख्य कार्यकर्त्यांनी निधी संकलनात भाग घेतला व गजुभाऊ च्या रुग्णसेवेने प्रभावित झालेल्या अनेकांनी आपला सहभाग या निधीत देऊन गजुभाऊ च्या निःस्वार्थ,व निष्काम रुग्णसेवेला प्रणाम केला.!
      हृदयात सेवाभाव जपला तर  समाजपुरुष त्या व्यक्तीचे ऋण कोणत्या ना कोणत्या मार्गाने फेडण्याचा प्रयत्न करीत असतो.
अशा वेळी समाज त्या व्यक्तीला डोक्यावर घेतांना त्याची जात, धर्म,पंथ श्रीमंत गरीब याचा विचार न करता केवळ त्याचा सेवाभाव जपत असतात.
      गोरगरीब रुग्णांना वैधकीय उपचार मिळावा यासाठी पायाला भिंगरी लावल्या प्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी अहर्निश प्रयत्न करणाऱ्या या फकिराची ही भटकंती कधी सायकलने तर कधी दुचाकी वर तर कधी महामंडळाच्या बसने किंवा मिळेल त्या वाहनांने फिरून रुग्णसेवेचे बांधलेले कंकण मजबूत करणाऱ्या या रुग्णमित्राची ही भटकंती पाहून त्यांच्या जवळच्या मित्र व कार्यकर्त्या नी त्यांच्या साठी एक चारचाकी वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व त्याची अंमलबजावणी सुद्धा केली पै -पै पैसा जमवून या सर्व कार्यकर्त्यांनी दोन लाख रुपयांची इंडिगो खरेदी करून  रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना अर्पण करून त्यांच्या निःस्वार्थ रुग्णसेवेत एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    समाज पुरुषांची निःस्वार्थ भावनेने सेवा केली तर तो समाज काय चमत्कार करू शकतो याचे एक उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे आज गजुभाऊ सारख्या निष्काम रुग्णसेवा करणाऱ्या कार्यकर्त्याची समाजाने चारचाकी भेट देऊन केलेला सन्मान होय.
    असा सन्मान आजवर कोण्या राजकारण,समाजकारणात सक्रिय असलेल्या कोणाच्या वाटेला आला असेल असे दिसत नाही.केवळ निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या गजुभाऊंच्या प्रवास व्यवस्थेसाठी कोणताही गाजावाजा न करता समाज पुरुषाने त्यांच्या कार्यासाठी त्यांना भेट दिलेली चारचाकी ही गजुभाऊंची श्रीमंती किती मोठी आहे याची जाणीव करून देणारी आहे.
    सामान्यातला सामान्य युवक एखाद्या समाजपयोगी ध्येयाने भारावला गेला तर जनताही असा वेद्यापीराला आपल्या हृद्यदसिंहासनावावर आरूढ करते हाच यातील बोध आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने