जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बायको घरी 'हिटलर'च असते, खासदार धानोरकरांची आमदार बायकोसमोर फटकेबाजी #chandrapur


चंद्रपूर:- महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आक्रमक पण तितकेच विनोदी स्वभावाचे. त्यांच्या विनोदी स्वभावाचा अनुभव त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना कायम येतो. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही ते सारख्या कोट्या करत असतात. आजही असंच झालं. चंद्रपुरातल्या एका कार्यक्रमात ते आपल्या आमदार पत्नीला कार्यक्रम हिटलर म्हणाल्याने कार्यक्रमस्थळी काही मिनिट खसखस पिकली.
कैद्यांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी कारागृहाला दोन टी.व्ही संच भेट दिले. कारागृहातील कैद्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले " चंद्रपुरात स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे. तसं झालं तर तुम्हाला महिन्यातून किमान एकदा भेटता येईल. तुमच्या समस्या समजून घेता येईल. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आमची हिटलर मॅडम आम्हाला परवानगी देईल".पुढे धानोरकर म्हणाले "बायको घरी हिटलरच असते. ज्याची परिस्थिती त्यांनाच ठाऊक. तुम्ही इकडे आहात (कारागृहात) बरे आहात. घरी असते तर तुमचीही परिस्थिती फार वेगळी नसती. जिसको बिवी है उसको पता है. जिसको नही है, उसका ठिक है... कारागृहात जेलर आहेत. घरी गेल्यावर ते जेलर नाही. जेलर कुणी वेगळेच असतात." "कैद्यांनो, तुमच्याकडून चुका झाल्यात. त्या चुका भविष्यात दुरस्त करायच्या आहेत. कुठलाही निर्णय घेताना शांत डोक्याने निर्णय घ्या. झालं गेलं ते विसरुन जा, नव्या आयुष्याला सुरुवात करा", असा संदेश यावेळी त्यांनी कैद्यांना दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत