Click Here...👇👇👇

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सितारामपेठ परिसरात मद्यपींचा "गोंधळ" #chandrapur #taboda

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सितारामपेठ परिसरात मद्यपींचा गोंधळ बघायला मिळाला आहे. काल दुपारी सितारामपेठ येथील तलावातील वनविभागाच्या बोटी मध्ये बसून 5 युवक दारू पीत होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले आणि त्यांनी युवकांना मनाई केली. 
मात्र मनाई केल्यावर त्यापैकी एकाने वनविभागाचे कर्मचारी सुरेंद्र मंगाम यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली.
भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली अन्सारी (20) याला अटक केली आहे. आरोपी चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील रहिवासी असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.