जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद #chandrapur #camera

पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झालीय. नागपूरच्या काही पर्यटकांनी टायगर सफारीसाठी मोहर्ली भागातल्या जुनोना बफर प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला होता. सफारीदरम्यान त्यांना ‘छोटी मधू’ वाघिणीनं दर्शन दिलं.
पर्यटक मंत्रमुग्ध......

यावेळी पर्यटकांनी ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकारही पाहिलीय. सफारीच्या दरम्यान छोटी मधू त्यांना पहिल्यांदा दिसली. काहीच वेळानं ‘छोटी मधू’नं सांबर वन्यजीवाची शिकार केली. त्यानंतर दमदार पावलं टाकत जिप्सीच्या दिशेनं आली. छोटी मधूच्या या आगळ्यावेगळ्या दर्शनानं पर्यटक मात्र मंत्रमुग्ध झाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीव श्रीमंतीची पर्यटकांनी मुक्तकंठानं प्रशंसा केलीय.
पर्यटकांची वळताहेत पावले.....

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातल्या चंद्रपूर जिल्ह्यातला एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. हे 1955पासूनचं महाराष्ट्रातलं सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान असून त्याचं क्षेत्र 623 किमी आहे. सध्या कोविडचा काळ असल्याने काही कालावधीसाठी ते बंद होतं. आता पर्यटक पुन्हा तिथं सफारीसाठी जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत