जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अनाथांचा हिरा हरपला:- सचिन यामावार #chandrapur

अनाथांची माय म्हणून जगभर परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. पद्मश्री सेवाव्रती सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाल्याचे समजले. अतिशय खडतर संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते.

अनाथांची माय हरपली!
👇👇👇👇👇
आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. या 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ. अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. अतिशय खडतर असे आयुष्य त्या जगल्या. पण या संघर्षातून त्यांनी अनाथ, दु:खी, कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला.
या स्वार्थी जगातील तुमचा प्रवास थक्क करणारा होता. जिथे लोक आपसात फक्त पैसा, प्रॉपर्टी साठी लढत असतात, तिथे तुम्ही तुमच संपूर्ण आयुष्य गोरगरीबांसाठी झटल्या, दुसऱ्या साठी जगण्यात सुध्दा वेगळा आनंद आहे तुमच्या समर्पक जीवनातून खुप काही शिकायला मिळाल, माय आज तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झालेला आहे.भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏😥

*शोकाकुल*
सचिन यामावार
संयोजक, सोशल मीडिया
भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा महानगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत