Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ऑल इंडिया पँथर सेना शाखा दुर्गापुर बोर्डाचे उद्घाटन #chandrapur

अन्याया विरोधात लढणारा पँथर - रुपेश निमसरकार
चंद्रपूर:- समग्र महाराष्ट्रात जातीय हल्ले होत असून सनातनी राजकारणी राजकीय पोळी शेकुन घेण्यात मोठी तत्परता दाखवत आहेत. महाराष्ट्रातील शेकडो जातीय हल्ले उघड्या डोळ्यांनी बघत राजकीय मंडळी आपला हेतू साध्य करण्यात गुंग असून आंतकवादाला बढावा देत आहेत. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचारांची म्हणून आहे. मात्र ह्या पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामीत्वाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. याला आव्हान देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे सरसेनापती पँथर चा वाघ दिपकभाई केदार महाराष्ट्रासह अनेक राज्यात समाजासाठी धाऊन जाऊन न्यायासाठी संघर्ष करीत आहेत. 📸
चंद्रपुर जिल्हात अनेक सामाजिक मुद्दे घेऊन ऑल इंडिया पँथर सेना सातत्याने संघर्ष करीत आहे. जिल्हात मोठ्या प्रमाणावर संघटनेचा विस्तार होत असून ठिकठिकाणी तालुका शाखा, वार्ड शाखा निर्माण होत आहेत. 📸
चंद्रपुर शहरातील दुर्गापुर शाखा नुकतीच गठीत करण्यात आली. व शाखा फलक लाऊन उद्घाटन करण्यात आले. या शाखा फलकाच्या उद्घाटनाप्रसंगी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोष डांगे,जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी शाखेचे सर्व पदाधिकारी व महिला पँथर हजर होत्या. 📸
शाखा फलकाचे उद्घाटन करुन दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदूबाबा मठ नगरीतील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व गृहाची नोंद करण्याची मागणी ग्रामसचिवांना करण्यात आली. येणाऱ्या आठ दिवसात या चंदूबाबा मठ नगरीतील नागरिकांना वरील मुलभुत सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाही तर ग्रामपंचायत दुर्गापुर ला नागरिकांचा आक्रोश घेऊन घेराव आंदोलन करण्याची चेतावनी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दिली आहे.
📸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत