जाहिरात... Advertisement... विज्ञापन

देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज #chandrapur

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोठे योगदान आहे. संपूर्ण जगाला त्यांनी शांती आणि अहिंसेचा मूलमंत्र दिला. अशा थोर महापुरुषांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (ता. ३०) महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सेवादलचे अध्यक्ष नंदू खनके यांची उपस्थिती होती. 
             
   रितेश (रामू) तिवारी यांनी, महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी खर्ची घातले आहे. देशाच्या स्वातंत्र लढ्यातही मोठे योगदान आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते, हे महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळेच महात्मा गांधी देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात पुज्यनीय असल्याचे सांगितले. 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांचे आवडते भजन सादर करण्यात आले. तसेच सामूहिक प्रार्थना करून, सांप्रदायिक सदभावनेची शपथ घेण्यात आली. दोन मिनिटे मौन धारण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नरेंद्र बोबडे, राजेश अडूर, कुणाल चहारे, प्रसन्ना शिरवार, गोपाल अमृतकर, नौशाद शेख, पप्पू सिद्दीकी, सलिम शेख, श्यामकांत थेरे, स्वाती त्रिवेदी, केतन दुर्सेलवार, कासिफ अली यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत