Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अजय देवगनचा 'रुद्रा' या वेबमालिकेचा ट्रेलर प्रदर्शित #Rudra


बॉलीवूडचा सिंघम अर्थात् अभिनेता अजय देवगनच्या आगामी 'रुद्रा' या वेबमालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अजय देवगण या वेबमालिकेच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे.
तसेच या वेबमालिकेमध्ये अजय मुख्य भूमिकेत दिसणार असून, वेबमालिकेमध्ये अजय एका पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे.
या वेबमालिकेचा ट्रेलर अजय देवगणने समाजमाध्यमावरदेखील सामायिक केला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही वेबमालिका प्रदर्शित होणार आहे. या वेबमालिकेची निर्मिती बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत