जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गडचांदूर भाग ३ (रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट) #gadchandur

सुंदर गडचांदूर स्वच्छ गडचांदूर फक्त कागदावरच

प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी कुणाची नगरसेवक की नगर परिषद च्या अधिकाऱ्यांची? प्रभाग १

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना

गडचांदूर शहरातही स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर फक्त कागदावरच कि काय याबाबत रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट आमच्या प्रतिनिधींनी सुरुवात केली. आज भाग ३ ची बातमी ऑन द स्पॉट तेथील रहिवाश्यांनी दिलेली मुलाखत बघा आमच्या यु ट्यूब चॅनल आधार न्यूज नेटवर्क वर....

सविस्तर बातमी अशी की गडचांदूर नगर परिषद होऊन ७ वर्षे पूर्ण झाली पण तेथील समस्या मात्र जैसे थे आहे. या कडे कुणीही जातीने लक्ष देत नाही. आपण गडचांदूर येथी स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर भाग ३ प्रभाग १आमच्या प्रतिनिधींनी गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 1 सार्वजनिक शौचालय पासून एका नगरसेवकाला रोज किती तरिदा या ठिकाणाहून ये जा करावे लागतात तर एका नगरसेविकेच्या हाकेच्या अंतरावरच घाण कचरा साचलेला दिसत आहे. या दुर्गंधीने तेथील रहिवस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. वैशाली नगर येथील जहिर सर यांच्या घराच्या मागच्या बाजूला व तिथेच लागून असलेल्या ओपन स्पेस घाण कचरा असून अक्षरांशा डुकरांचा हैदोस असतो. त्या बाबत शिक्षक जाहीर सैय्यद यांनी अनेक निवेदने नगर परिषद ला दिले, मात्र त्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवण्यात आली. या समस्या बद्दल जहिर सैय्यद यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले त्या बाबदत जिल्हाधिकरी यांच्या कार्यालयातून नगर परिषद ला पत्र प्राप्त झाले. मात्र त्यावर सुद्धा काहीही कार्यवाही झाली नाही.जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सुद्धा नगर परिषद ने केराची टोपली दाखवली असा आरोप जहीर सैय्यद यांनी केला. स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर हे फक्त कागदावरच का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वैशाली नगर येथील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या त्यावर नगराध्यक्ष यांना समस्याबद्दल फोन वर प्रतिक्रिया विचारली असता कोणतीही प्रतिक्रिया न देता फोन काटून टाकला. तर नगर सेवक यांना संपर्क केला आसता संपर्क होऊ शकला नाही.

व्हिडिओ बघा आधार न्यूज नेटवर्क वर त्यावर प्रभाग १ च्या रहिवाश्यांनी दिलेली प्रतिक्रिया एकदा अवश्य बघा.

आमच्या आधारन्यूज नेटवर्क रिपोर्ट ग्राउंड लेव्हल ऑन द स्पॉट गडचांदूर भाग ४ ला आपण सुद्धा आमच्या प्रतिनिधीला कळवा आपल्या प्रभागातील समस्या त्या पोहचवू वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत... आपल्या समस्या वर काही तरी तोडगा काढण्याचा प्रयत्न..... आपण ही सहभागी व्हा! स्वच्छ गडचांदूर सुंदर गडचांदूर मध्ये व आपल्या समस्या व आपल्या प्रभागातील अस्वच्छता 9890940044

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत