Top News

सल्लागांगराशक्ती ह्या गोंडीपुनेमी मूल्यांची जोपासना होणे काळाची गरज :- गजानन पाटील जुमनाके #gondpipari

तोहगाव परसोडी येथे समजप्रबोधन मेळावा संपन्न
गोंडपिपरी:- सल्लागांगराशक्ती हेच खरे तर गोंडी पुनेमी मूल्य अभिव्यक्त करणारी प्राचीन काळातील आईवडीलांना पुज्य मानणारी संस्कृती आहे. आपल्या पुर्वजांना जपणारी उत्तम व्यवस्था आहे. सल्ला हे वडीलांचे प्रतीक असून गागराशक्ती आपल्या मायेचेरूप आहे. खरं म्हणजे ह्याच्यापासूनच गोंड, गोंडी, गोंडवाना जिव जगतची उत्पती झाली आहे, ही मूळ व्यवस्था असून धन व ऋण दोन केंद्र जसे विज्ञानात महत्त्वाचे आहेत तसेच सजीवसृष्टीची निर्मिती होण्यासाठी बीज निर्मिती करणारे बीजोत्पादन महत्त्वाचे आहेत ते हेच सल्लागांगराशक्ती आहे म्हणून सल्लागांगराशक्तीची स्थापना करून कोयापुनेमी मुल्याचे जतन होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी परसोडी येथील समाज प्रबोधन मेळाव्यात केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गेडाम साहेब राउंडर आॕफीसर हे होते तर तिरू बापुराव मडावी जिल्हा अध्यक्ष गोंगपा चंद्रपूर तिरू अशोक कुळमथे भूमक संघाचे गोंडी पुनेम प्रसारक पांडूरंग जूमनाके गोंडी धर्म प्रचारक चांदागड, हनुमंत कुमरे जिवती, तिरू आनंद गेडाम आदिवासी लोकजागर संघटना वरोरा, आनंदराव कुमरे माजी सरपंच, सौ सुनिता जुमनाके भूमक मंडळ, तिरू छायाताई तलांडे, सौ आनंदाताई आत्राम तसेच गावातील सगाबांधव उपस्थित होते.
गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहण गोंडीयन विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश वट्टी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ प्रकाश वट्टी यांनी कोयापुनेम या विचारांची गरज आज समाजालाच नव्हे देशाला गरज आहे. लिंगोनी सगागोत्र व्यवस्थेची रचना करून टोटेम, सर्व कल्याणकारी दर्शन व मुन्जोक सिंध्दात हा अहिंसा तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता आहे हे मानवी कल्यानाचा मार्ग सांगितला ह्यात सर्व जीवजगत सृष्टी सामावलेली आहे खरे तर टोटेमपासून पर्यावरण व सजीवसृष्टीमध्ये संवर्धन हे मानवी हिताचे पर्यावरण पोषक विचारांची गुंफन आहे. आणि म्हणून गोंडी पूनेम व्यवस्था हीच देशाला तारक ठरणार आहे. ही जगातील फार प्राचीन संस्कृती असून आदर्श मूल्ये जपणारी संस्कृती आहे. असे डॉ वट्टीनी विचार व्यक्त केले.
तसेच तिरू बापुराव मडावी यांनी गोंडी संस्कृतीचे पंचतत्वज्ञान सांगून गोटूलचे महत्त्व सांगितले तर अशोक कुळमथे साहित्यिक, यांनी जयसेवाचा मंत्र सांगून गोंडवाना हा पाचखंडात कसा होता यांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कडू सर यांनी केले यावेळी गोंडी नृत्याचे सादरीकरण करून कार्यक्रम संपन्न झाला. या प्रबोधन मेळाव्याचे आयोजन सुजीत मेश्राम व परसोडी येथिल जागतीक गोंड सगामांदीचे सगागोत्र यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने