Top News

जिल्हा परिषद, चंद्रपूर कडून चेकठाणेवासना ला फॉगिंग मशीन उपलब्ध #Chandrapur

इंजि. वैभव पिंपळशेंडे यांच्या मागणीला आणि सतत केलेल्या पाठपुराव्याला यश.

गावकऱ्यांनी मानले सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्षा, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे आभार!
पोंभुर्णा:- सौ. संध्याताई गुरणुले अध्यक्षा, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2021 ला डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची माहिती घेण्याकरिता चेकठाणेवासना गावाला विशेष भेट दिली होती त्यावेळी फॉगींग मशीन आणि गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन 15 ते 20 वर्ष जुणी असल्याकारणाने बदलवून मिळावी अशी मागणी इंजि. वैभव पिंपळशेंडे सदस्य, ग्रामपंचायत चेकठाणेवासना तथा युवा कार्यकर्ता भाजपा, पोंभूर्णा यांनी केली होती.
काही दिवसाआधीच गावातील पिण्याच्या पाण्याची संपूर्ण लाईन बदलविण्याचे काम सुरू झाले होते आणि काल दिनांक, 03 जानेवारी 2022 ला कुमारी अल्काताई आत्राम सभापती, पंचायत समिती पोंभूर्णा आणि साळवे सर संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती पोंभूर्णा यांच्याहस्ते फॉगिंग मशीन देण्यात आली.
यावेळी भूपती मसराम सचिव, ग्रामपंचायत चेकठाणेवासना उपस्थित होते अश्याप्रकारे दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्यामुळे सर्व चेकठाणेवासना वासियांतर्फे मा. सौ. संध्याताई गुरणुले अध्यक्षा, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने