जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाचनभट्टी येथे नोटबुक वितरण #Sindewahi

Bhairav Diwase
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे:- रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपूर
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाचनभट्टी येथे दिनांक 3/1/2022 रोजी क्रांतिजोति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्याने नोटबुक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांनी केले. आपल्या उदघाटनीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे आश्वासन रमाकांत लोधे यांनी केले. शाळेत विद्यार्थना गरीब-गरजु विद्यार्थ्यांच्या या नोटबुकचा फायदा होईल. आजचा विद्यर्थि हा उद्याचा नागरिक आहे. आज सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढली आणि सर्वाना शिक्षण घेता आले. आज बालिका दिन निमित्य साधुन सर्व विद्यार्थना मी शुभेच्या देतो. शाळेच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर, विद्या खोब्रागडे सरपंच नाचनभट्टी, सुरेश राउत मुख्यधापक नाचनभट्टी, परमानंद चहांदे ग्रामपंचायत सदस्य नाचनभट्टी, भीमराव खोबरागड़े नाचनभट्टी, मंगेश मेश्राम रत्नापुर, मंगेश खोब्रागडे शिक्षक नाचनभट्टी, नेवारे शिक्षक , लोखंडे शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खोब्रागडे शिक्षक आभार प्रदर्शन नेवारे सर यांनी केले.