पिट्टीगुडा येथिल अशोक जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कारानी सन्मानीत #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:-जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अशोक दि जाधव चंद्रपूर यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२ वैजापूर पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले पंचायत समिती सभागृह वैजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला असून या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय निकम, कैलास प्रजापती उप विभागीय पोलिस अधिकारी , श्रमिका दळवी आत्मनिर्भर फाऊंडेशन मुंबई समाजसेवक, मारोती देसाई बजाज ऑटो इंजिनिअर औरंगाबाद,सिंग राजपूत माजी शिक्षण संचालक पुणे,पवन चंद्रकांत कापरे साहेब एस एन डी काॅलेज इंजिनिअरिंग येवला, समाधान पाटील माजी सैनिक,गोकुळ पाटील माजी सैनिक, पत्रकार डॉ हरिष साबणे, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आले
या वेळी कार्यक्रमांचे प्रस्ताविक सुर्यकांत पाटील मोटे ( पोलिस पाटील गोयगाव) तथा महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव यांनी केले या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, क्रिडा, आरोग्य,कवि, पत्रकार, पोलिस पाटील, इंजिनिअर, डॉ, तंत्रज्ञान, कृषी व उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे असे प्रशासकीय अधिकारी, आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य केले या ५१. सदस्य जणांचे गौरव पत्र, सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत