Click Here...👇👇👇

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील नववीपर्यंत शाळा बंद #Maharashtra

Bhairav Diwase
राज्यातील महाविद्यालयांबाबत दोन दिवसात निर्णय
मुंबई:- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधल्या पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसंच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
राज्यातही गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल रुग्णसंख्या तब्बल सहापटीनं वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.