Top News

चंद्रपूरच्या त्या रुग्णासाठी आ.सुधीर मुनगंटीवार ठरले 'देवदूत' #chandrapur

मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात कृतिका किशोर दुर्योधन यांच्यावर उपचार सुरू
         
 उपचारासाठी ७ लक्ष रुपये मंजूर

दुर्योधन कुटुंबाने मानले सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
कुठलीही समस्या दिसली की ती तडीस नेण्यासाठी तळमळीने धावून जाणे, कुणाला मदतीची गरज असल्याचे कळताच ती मदत मिळवून देण्यासाठी प्राणपणाने झटणे, अशी ख्याती लाभलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माणुसकीचा परिचय देत आणखी एका रुग्णाकरीता अक्षरशः देवदुताची भूमिका पार पाडली आहे... जिच्या संदर्भात ही बाब घडून आलीय्, त्या रुग्ण बालिकेच्या कुटुंबीयांची भावना तरी अशीच आहे....
चंद्रपूर येथील कु.कृतिका किशोर दुर्योधन मागील अनेक दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने त्रस्त होती. ती नागपूर येथे उपचारासाठी पोहचली पण तिच्या उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेवरती एकूण खर्च ७ लाख रुपये लागणार असल्याचे नागपूरच्या डॉक्टरकडून सांगण्यात आले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिचे कुटुंब कृतिकाला घेऊन चंद्रपूरला परतले.
दुर्योधन कुटुंब आर्थिकदृष्ट्या असमर्थ असल्यामुळे उपचार करणे अश्यक्य झाले होते. नैराश्येने अस्वस्थ झाले होते. उपचाराअभावी तिला असह्य वेदना सुरू झाल्या. या वेदना बघून तिच्या कुटुंबाने यावर काही मार्ग काढावा, या आशेने अनेकांना मदतीसाठी विनंती केली मात्र कुणीही तिला मदत करायला तयार नव्हते.
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुणाकडून मदत घेतल्याशिवाय तिच्या उपचाराला दुसरा पर्याय नव्हता. शेवटी भाजयुमो अध्यक्ष आशिष देवतळे व मोहित डंगोरे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडे त्यांनी कृतिकाच्या उपचाराविषयी काही मदत मिळेल या आशेने विचारणा केली. आशिष देवतळे व मोहित डंगोरे यांनी  आ.सुधीर मुनगंटीवार यांना सदर विषय सांगितला. संवेदनशील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही बाब ताबडतोब मार्गी लावण्यासाठी त्यांचे वैद्यकीय सहाय्यक सागर खडसे यांना सूचना केली व धर्मादाय आयुक्त यांना पत्राद्वारे सदर रुग्णाला शासकीय योजनेखाली मोफत इलाज मिळावा या करिता विनंती केली. सागर खडसे यांनी रुग्णासोबत मुंबई गाठली आणि ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
 ब्रीच कँडी हॉस्पिटलचे संचालक व विश्वस्तांना आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राद्वारे केलेली विनंती आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील कलम क क  (१) अन्वये १० टक्के (निर्धन रुग्ण) मोफत इलाज करण्यासाठी धाडलेल्या पत्राची दखल घेत ७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. कुठलीही अनामत रक्कम न घेता आयपीएफ मधून त्यांना उपचारासाठी भरती करून घेतले गेले.                       
कृतिकाला योग्य उपचार मिळण्यासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले. या उपचारामुळे आमच्या लेकीला निरोगी आयुष्य जगता येईल  यापेक्षा मोठा आनंद आम्हा पालकांसाठी दुसरा काय असणार.... अशा शब्दात मोफत उपचाराबद्दल दुर्योधन कुटुंबांनी सुधीरभाऊंचे आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने