कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक #college


मुंबई:- राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंबरोबर एक बैठक झाली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.
रुग्ण वाढू लागल्याने आपल्याकडेही महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुन्हा ऑनलाइन सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. सर्वाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंबरोबर आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. . विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत