पत्नीसोबत प्रेमाने वागा, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पत्नीचा मिश्किल संदेश #massege


चंद्रपूर:- आपल्या पत्नीसोबत प्रेमाने वागा, असा मोलाचा सल्ला चंद्रपूरमधील काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे ‘आमदार’ पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीच पाठवलेला मेसेज धानोरकरांनी व्हॉट्सअँप स्टेटसवर ठेवला आहे. लॉकडाऊन लागला तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होती, असं बाळू धानोरकरांनी मित्रमंडळींना बजावलं आहे.


काय आहे मेसेज?

सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागला, तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ नयेत, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा, असा मिश्किल संदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. हा संदेश देणारं स्टेट्स त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे.
धानोरकरांच्या या स्टेटसची सध्या समर्थकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा मेसेज त्यांना आमदार असलेल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीच पाठवला होता. त्यामुळे त्यांनी लगेच हा मेसेज आपल्या स्टेटसवर पोस्ट केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत