निवासी घराच्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या #mul

पंधरा दिवसाचे आत मागणी पूर्ण न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा


चंद्रपूर:-मुल शहर निवासी मागील तीस वर्षापासुन मुल शहरात वास्तव्यास असुन आम्हाला स्वताचे निवासाकरीता जागा नाही. तेव्हा आम्ही आपआपल्या परीने जागा संपादित करून मागील तीस वर्षापासून वास्तव्य करीत आहोत. परंतु आम्हाला स्वतःच्या निवासासाठी हक्काची जागा नाही. तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून आम्हाला मालकी हक्काचे निवासी पट्टे देण्यात यावे. या आशयाचे निवेदन मनसेचे चंद्रपूर जिल्हासचिव (बल्लारपूर विधाणसभा)श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत तहसीलदार मुल तसेच मुख्याधिकारी नगरपरीषद मुल यांना देण्यात आले.
सदर मागणी पंधरा दिवसाचे आत पूर्ण न झाल्यास आम्ही मनसे शैलीने तीव्र आंदोलन करणार आणि याला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहणार अशी चेतावणी हि देण्यात आली.
निवेदन देतांना मनसेचे जिल्हासचिव किशोरभाऊ मडगुलवार (बल्लारपूर विधाणसभा), मनविसे मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे, मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम, पोंभूर्णा तालूका उपाध्यक्ष रोशन भडके तसेच मारोती निमगडे, अजय पटवाळी, खोब्रागडे, मांदाळे व मनसैनिक उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत