Click Here...👇👇👇

पोंभूर्णा येथे आधारभूत धान खरेदी सुरू #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा :- कृषि उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा कार्यालयाअंतर्गत १९ जानेवारीला महाराष्ट्र शासनाची ( मार्केटींग फेडरेशन ) हमी भाव खरेदी केंद्र योजनेचे शुभारंभ बाजार समितीचे मुख्य प्रशासक कवडू कुंदावार यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंभूर्णा तालुक्यातील हद्दीतील सर्व शेतकऱ्यांनी आपला चांगला प्रतिचा व उच्च दर्जाचा शेतमाल महाराष्ट्र शासन अधिकृत खरेदी केंद्रावर विक्री करून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे मुख्य प्रशासक यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी भेसळयुक्त ओलसर व पाखड असलेला माल सदर खरेदी केंद्रावर विक्री करीता आणू नये. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी शर्थीप्रमाणे मालाची खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी उच्च प्रतिचा माल विक्रीस आणावा कनिष्ठ दर्जाचा पाखड असलेला माल केंद्रावर स्विकारल्या जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक कवडू कुंदावार, सचिव लिलाधर बुरांडे, शामराव पद्मगिरिवार,प्रितीश कुंदावार,प्रा.विजय लोणबले, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.