रत्नापुर येथील कॅन्सरग्रस्त श्री जीवन सोनवाणे यांना आर्थिक मदत #sindewahi

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकरी कल्याण निधीचा धनादेश वितरीत
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- रत्नापुर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरच्या वतीने शेतकऱ्यासाठी हितकारक "शेतकरी कल्याण निधी योजना" राबविण्यात येत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार ,बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषजी रावत यांच्या संकल्पनेतून शेतकरी कल्याण निधी योजना शेवटच्या घटकातील शेतकरी कुटुंबाला अर्थसहाय करण्याचे काम सातत्याने करते आहे. जर्जर गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी सदर योजनेतून लाभ मिळून त्यांना नवजीवनाची संजीवनी सदर योजनेतून मिळत आहे.
🌅
रत्नापुर येथील युवक शेतकरी श्री जीवन शामराव सोनवाणे मागील 2 वर्षांपासून तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असून आजपर्यंत विविध हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी मोठा खर्च करीत आता त्याचेवर मुंबई येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट, मुंबई येथे डॉ. स्वप्नील अग्रवाल यांच्या निगरानित उपचार सुरू आहेत.
🌅
    सदर रुग्णाची माहिती क्षेत्राचे जि. प.सदस्य तथा तालुका कॉंग्रेस कमिटी, सिंदेवाहीचे अध्यक्ष श्री. रमाकांत लोधे यांना लागताच त्यांनी जि.म. स.बॅकचे संचालक श्री. प्रकाश बन्सोड यांच्या पर्यंत पोहचवून "शेतकरी कल्याण निधी"योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करीत योजनेचा लाभ संबंधित रुग्णाला मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने शेतकरी कल्याण निधी योजनेचा धनादेश श्री. जीवन शामराव सोनवाने यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत वितरीत करण्यात आला. 
    🌅
           सदर प्रसंगी श्री रमाकांत लोधे सदस्य जि.प.चंद्रपूर, बँकेचे संचालक श्री प्रकाश बन्सोड, सिंदेवाही शाखेचे व्यवस्थापक श्री. लेंझे साहेब, श्री. संजय गहाणे उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही,रत्नापुर ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री उद्धवराव तोंडफोडे, श्री. मंगेश मेश्राम, सदस्य ग्रा.पं. रत्नापुर, श्री. इम्रान पठाण सदस्य ग्रा.प. रत्नापुर, श्री. सुरेश लोधे, श्री घनश्याम बोरकर, श्री. वामन जीवतोडे, श्री. सुरेश गहाणे, श्री दिलीप तोंडफोडे आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
           🌅