चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड #tiger #photography


चंद्रपूर:- चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. केवळ 5 फूट दुरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचे व्हायरल व्हिडिओतुन स्पष्ट झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत.
जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांच्या उत्तम व्हिडीओ-फोटो साठी वन्यजीवविषयक मुलभूत नियमांची पायमल्ली हौशी फोटो-व्हिडिओग्राफर्स करत आहेत. वाघांच्या या पॅपेराझिना शोधून वनविभागाने त्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात वाघ रस्त्यावर सहजपणे दिसल्याच्या घटना घडतात. मात्र ग्रामस्थाना वाघाचे वर्तन ठाऊक असल्याने ते शिस्तीत आपला मार्ग निवडतात. मात्र ताज्या व्हायरल व्हिडिओत दिसलेली वाघांचा माग काढत त्यांचे फोटो-व्हिडीओ घेण्याची क्रेझ जीवावर बेतू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत